भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील श्री देवी भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण होते. दसऱ्याला २ ऑक्टोबर रोजी सोहळ्याचा समारोप होणार आहे. प्रास्ताविकेत ॲड. पलाश चव्हाण यांनी भैरवी मंदिरच्या उभारणीचा व भजन महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला. स्वागत भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, उद्योजक नितीन तायशेटे, उद्योजक विजय केनवडेकर, नाभिक समाज नेते विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, सौ. स्मृती महेश कांदळगावकर, उद्योजक अनिल मालवणकर, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. बुवा केतन आजगावकर यांचा तसेच गोमाता रक्षणासाठी मोफत वकिली सेवा बजावणारे ॲड. पलाश चव्हाण यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला.
देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. अशाप्रकारे परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. भजनातून होत असलेले संस्कार आणि दिशादर्शक प्रबोधन सर्वांनाच महत्वाचे असते. आज परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी भजनसेवा ही एक अत्यानंद मिळवून देणारी आहे. नाभिक समाज बांधवांची एकी आणि त्यातून निर्माण होत असलेले उत्सव यामुळे त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना आपल्याला आपल्या गावातीलच उत्सव असल्याचे वाटत आहे, असे प्रतिपादन उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.
यावेळी उद्योजक दत्ता सामंत यांनी मंदिर सुशोभिकरणासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य आपण करणार असल्याचे सांगत मंडळाचे कौतुक केले. तसेच जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, नाभिक समाज नेते विजय चव्हाण यांनी देखील मंडळाची प्रशंसा केली.
यावेळी मालवण बंदरजेटी येथे गणपती विसर्जन करण्यासाठी हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीड, पाच, सात, नऊ, दहा आणि अकरा दिवसांच्या गणपतींसाठी मोफत गणपती विसर्जन सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या योगदानाबद्दल भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाच्यतीने उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकत्यांचा भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन ॲड. पलाश चव्हाण यांनी केले. महोत्सव यशस्वीतेसाठी राजन सकपाळ, उदय चव्हाण, रोहन चव्हाण, कांता चव्हाण, उत्तम चव्हाण, ललित चव्हाण, हेमंत चव्हाण, किशोर चव्हाण, बाली चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप वायंगणकर, उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, कौशल वस्त, जयेश कुबल तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल