पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट.
पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट.
सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली.
कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोयंबतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे थांबा, मांडवी एक्सप्रेसचा नांदगाव येथे थांबा, मडुरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या, पीआरएस काउंटर, प्रवासी सुविधा उन्नतीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी भेटी दरम्यान केली. मंत्री वैष्णव यांनी या मागण्या व प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्याची ग्वाही दिली असल्याची माहिती मिळते आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...