ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचे आदर्श कथामाला पुरस्कार जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचे आदर्श कथामाला पुरस्कार जाहीर.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचे आदर्श कथामाला पुरस्कार जाहीर.


आचरा | ब्यूरो न्यूज : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे 'आदर्श कथामाला शाखा पुरस्कार' नुकतेच जाहीर झाले. यामध्ये, माध्यमिक विभागातून प्रगत विद्यामंदिर रामगड हायस्कूल आणि प्राथमिक विभागातून आकारी ब्राह्मण विद्यामंदिर, चिंदर बाजार शाळेची निवड झाली आहे. 

Article image

आदर्श कथामाला निरीक्षण आणि निवड समितीचे अध्यक्ष सदानंद मनोहर कांबळी यांनी एका पत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षी शाळेमधील आठवडा कथामालेचे नियमित आयोजन, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, पालक आणि शिक्षक यांचे शाळेसाठी योगदान, शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावणे अशा निकषांवर सातत्यपूर्ण निरीक्षण करून समिती ही निवड जाहीर करते.

    

यापूर्वी मालवण, कणकवली, देवगड आदी परिसरातील बारा कथामाला शाखांना हा पुरस्कार लाभला आहे. जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी संबंधित शाळांमध्ये जाऊन शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा गौरव करणार आहेत. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असून शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि विद्यार्थीवृंद यांचा गौरव होणार आहे. 

Article image

    

या पुरस्काराबाबत सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष, कथामाला मालवण) यांनी दोन्ही कथामालांची प्रशंसा केली असून अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स