मसुरेतील स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात.
मसुरेतील स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात.
मसुरे | ब्यूरो न्यूज : श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टच्या वतीने मसुरे, कावावाडी येथील 'पेडणेकर बंधू निवास' येथे, आर. पी. बागवे हायस्कूल आणि भरतगड इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थी गुणगौरव आणि श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री राम स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कै.सौ पुष्पलता उत्तम पेडणेकर आणि कै. मामा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ३० स्पर्धकांचा सहभाग होता विजेत्या १४ स्पर्धेकांना बक्षीस देण्यात आले.
वैष्णवी सावंत, प्रिशा खोत, नंदिनी आंबेरकर, कोमल मोंडकर, मिहीर मसुरकर, स्वानंदी हिंदळेकर, सांजवी जाधव, रणजीत पेडणेकर, प्रांजल आंबेरकर, वेदिका पेडणेकर, सौ. प्रिया खोत, सौ. प्रतिभा भगत श्री. सुधाकर भगत, सौं. प्रतिभा वेंगुर्लेकर यांना रोख पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण ज्योतिषचार्य आडवलकर गुरुजी यांनी केले. बक्षीस वितरण परमानंद पेडणेकर, अध्यक्ष शरद पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर दिगंबर येसजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष बाबू पेडणेकर, समीर पेडणेकर,सचिन मालवणकर, सुहास पेडणेकर, साई पेडणेकर,परमानंद पेडणेकर, खजिनदार राजाराम खोत, दिनू पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, साईप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, बबन पेडणेकर, रमण पेडणेकर, निखिल पेडणेकर, पियुष पेडणेकर, शितल पेडणेकर, चिंतनी पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर, मधुरा पेडणेकर, प्रियंका पेडणेकर, पल्लवी पेडणेकर, भूपेश पेडणेकर, मनाली पेडणेकर,, प्रीती पेडणेकर, प्रतिभा पेडणेकर, सुनीता पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, दर्शित पेडणेकर, सुजाता पेडणेकर, सायली पेडणेकर, अनुजा पेडणेकर, किरण पेडणेकर, निधी पेडणेकर, अरुण आंबेरकर तसेच कावा वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...