मालवणात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रुग्णवाहीकांचे लोकार्पण.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक तसेच शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ह्या रुग्णवाहिकांचे दातृत्व.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह प्रांगणात, आज १९ ऑगस्टला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकर्पण करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक तसेच शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ह्या रुग्णवाहिका आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक तसेच शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या दातृत्वाची विशेष प्रशंसा केली. शहरच्या आरोग्यविषयक सक्षमीकरणात भर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा समन्वयक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, ज्येष्ठ समाजसेवक नकुल पार्सेकर, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, बबन शिंदे (उपजिल्हा प्रमुख, कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख. ), माजी नगरसेवक विलास उर्फ पिल्या मुणगेकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये, अभय कदम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, परशुराज पाटकर, तालुका पदाधिकारी बाळू नाटेकर, किसन मांजरेकर, कमलाकर मांजरेकर, राजन परुळेकर, संग्राम साळसकर, सौ. अंजना सामंत, सौ. सोनाली पाटकर तसेच शहर व तालुक्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरीक उपस्थित होते.
केवळ इंधन भरून ना नफा ना तोटा या तत्वावर या रुग्णवाहिका सुरू रहाणार असल्याची माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)