ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवा उद्योजक रोहन सावंत यांची वाढदिवशी शैक्षणिक मदत.

युवा उद्योजक रोहन सावंत यांची वाढदिवशी शैक्षणिक मदत.

प्रकाशन: 18 Aug 2025 11:45 AM
वाचन संख्या 169


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील युवा उद्योजक रोहन सावंत यांनी ०८ ऑगस्ट रोजी, तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक महती समजावून दिली. 


Article image


या उपक्रमांतर्गत रोहन सावंत यांनी मालवण परिसरातील अनेक प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड, जीवन शिक्षण विद्या मंदिर कोळंब नं. १, बालविकास मंदिर न्हिवे, कांदळगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वखैदा कातवड या शाळेचा समावेश होता. त्यांनी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.


संबंधित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी, युवा उद्योजक रोहन सावंत यांची विशेष प्रशंसा केली आणि कृतज्ञता व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स