ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी साईनाथ चव्हाण.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी साईनाथ चव्हाण.

प्रकाशन: 18 Aug 2025 07:58 PM
वाचन संख्या 273

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी साईनाथ चव्हाण. 


मालवण | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीत साईनाथ चव्हाण यांचा वाटा असल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी श्री. चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.


Article image


मालवण वायरी येथील साईनाथ चव्हाण हे गेली चाळीस वर्षे राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पद, मालवण तालुका काँग्रेस अध्यक्षपद, सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद व नंतर सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद अशा जबाबदाऱ्यांवर त्यांनी कामं केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी गेली कित्येक वर्षे काम केल्यानंतर आता त्यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद भूषविताना श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील अनेक सत्तास्थाने काँग्रेस पक्षांकडे ठेवण्यात महत्वाचे काम केले होते.


श्री. चव्हाण यांची काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने निश्चितपणे काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 110

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स