ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 18 Aug 2025 10:40 AM
वाचन संख्या 181


मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुकन्या कट्टा) व जय हनुमान मंदिर ट्रस्ट, आनंदव्हाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव नुकताच संपन्न झाला. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात 

उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

1000241238


या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी अमोल करंदीकर, जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, मंडळ कृषि अधिकारी आचरा हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप दशरथ सावंत, सरपंच आनंदव्हाळ श्रीम. रश्मी टेंबुलकर, सरपंच कातवड श्रीम. प्रतीक्षा हळदणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, सिताराम परब, श्रीपाद चव्हाण, श्रीम. राणी थोरात, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा मालवण श्री निलेश गोसावी, व्यवस्थापक सिंधुकन्या सीएमारसी ( CMRC श्रीम. गीता चौकेकर, पाककला परीक्षक श्रीम. कविता तळेकर, रानभाजी तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र शृंगारे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

1000241243

तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी रानभाज्या संवर्धनासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. महोत्सवात रानभाज्यांची ओळख, त्यांचे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात कोकणातील तब्बल ३२ रानभाज्यांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सेवक श्रीम. स्नेहा खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी धनंजय गावडे यांनी केले.








विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स