कोमसाप कणकवली प्रस्तुत कवी कट्टा कार्यक्रमात जिल्हा संघटक रुजारिओ पिंटो यांची प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती.
कोमसापचे नूतन तथा फेरनियुक्त जिल्हाध्यक्ष मंगेश मस्केंचा सत्कार होणार.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेतर्फे 'श्रावणातील काव्यप्रवाह कवी कट्टा २०२५' या काव्य संमेलनाचे आयोजन सोमवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता कणकवली जिल्हा परिषद शाळा क्र. ५ (शिवाजी नगर) येथे करण्यात आले आहे. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक व सुप्रसिद्ध कवी रूजारिओ पिंटो उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नुकतेच फेरनिवड झालेले श्री. मंगेश मसके उपस्थित राहणार असून, याप्रसंगी त्यांच्या सत्काराचा समारंभही संपन्न होणार आहे.
काव्यप्रेमींना आणि कवींना सादरीकरणाची संधी मिळणाऱ्या या संमेलनात जास्तीत जास्त कवींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष माधव कदम, कार्यवाह निलेश ठाकूर, संयोजक गणेश जेठे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री कल्पना मलये यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)