ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वायरी तेली पाणंद ग्रामस्थांची आमदार निलेश राणे यांच्याशी भेट.

वायरी तेली पाणंद ग्रामस्थांची आमदार निलेश राणे यांच्याशी भेट.

प्रकाशन: 31 Jul 2025 08:10 PM
वाचन संख्या 135


बंधाऱ्याचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांना केले आश्वस्त.


मालवण | ब्यूरो न्यूज : सागरी अतिक्रमण बाधित वायरी तेली पाणंद समुद्रकिनारी परिसरालगत असलेल्या ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान, याठिकाणी सागरी बंधारा उभारणी करून संरक्षण मिळवून देणे बाबत प्रस्ताव ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मंजूर बंधाऱ्याचे भूमिपूजन लवकरच होईल, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Article image


बंधारा नसलेल्या भागात लाटांच्या तडाख्यात नुकसान होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या भागाची पाहणी करत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. आमदार राणे यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी मालवण दौऱ्यात ग्रामस्थांची भेट घेत त्यांना आश्वासित केले.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळुस्कर, वायरी भूतनाथ विभाग प्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, कान्हा माडये, विनय मातोंडकर, क्रांती माडये, साईनाथ माडये, सुजाता मातोंडकर, अनुराधा पाटकर, प्राजक्ता पाटकर, उदय पाटकर, किरण वालावलकर, कृपाल वालावलकर, चेतन मांजरेकर, वल्लभ पाटकर, गुरु तळवडेकर, प्रसाद डिचोलकर, संदेश तळगावकर, गुरु पाटणकर, दादा वेंगुर्लेकर, सुदेश मयेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 207

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स