ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यातील २९ भूमिहीन कातकरी कुटुंबांना भूखंड.

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यातील २९ भूमिहीन कातकरी कुटुंबांना भूखंड.

प्रकाशन: 31 Jul 2025 07:50 PM
वाचन संख्या 124


प्रधानमंत्री जनमन आवास योजनेतून घरबांधणी होणार.


मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण तालुक्यातील २९ भूमिहीन कातकरी कुटुंबांना प्रधानमंत्री जनमन आवास योजनेतून घर बांधणीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान काही कातकरी कुटुंबियांच्या नावे झालेले भूखंड खरेदीखत आमदार निलेश राणे यांनी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.


Article image


मालवण तालुक्यातील २९ लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून मिळणार आहेत, अशी माहिती मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली आहे.


आमदार निलेश राणे यांनी कुंभारमाठ येथे कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मालवण पंचायत समिती येथेही वडाचापाट येथील कातकरी कुटुंबियांची भेट घेतली. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडून योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.


Article image


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुंभारमाठ उपसरपंच जीवन भोगावकर, संजय लुडबे, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, दत्तात्रय नेरकर आदी उपस्थित होते.


कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक २२ गुंठे शासकीय भूखंड २५ कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेसाठी मिळावा यासाठी प्रस्ताव तालुका व प्रांत स्तरावरून जिल्हाधिकारी स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला. याठिकाणी २५ कुटुंबांना हक्काचे घर उभारून दिले जाणार आहे. त्यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक रवींद्र पाटील यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे अशी माहिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली.


Article image


वडाचापाट येथील ४ कातकरी कुटुंबियांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेतून घर बांधणीसाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. नारायण पवार, संग्राम पवार, महेश पवार, नितेश पवार या वडाचापाट येथील ४ कातकरी कुटुंबियांना मोहन गिरगवाकर, ललिता घाडी, प्रतिभा घाडीगावकर, दर्शना घाडी, श्रुतिका घाडी, अशोक गिरगांवकर, यांच्या माध्यमातून हा भूखंड प्राप्त झाला आहे. ४ कातकरी कुटुंबियांच्या नावे केलेले खरेदीखत आमदार निलेश राणे यांनी दुय्यम निबंधक प्रवीण हिंदळेकर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. याकामी तहसीलदार वर्षा झालटे यांचे सहकार्य लाभले असे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स