महिला सेना जिल्हासचिवपदी कविता मोंडकर.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेना जिल्हा सहसचिव पदी मालवण येथील कविता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी कविता मोंडकर यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, संजय पडते, वर्षा कुडाळकर, दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)