हिंदुधर्मरक्षक भागोजीशेठ कीर जयंती सोहळा उत्साहात.
अध्यक्षस्थानी नवीनचंद्र बांदिवडेकर तर कांत सावंत व मान्यवरांची उपस्थिती.
ब्यूरो न्यूज : हिंदुधर्मरक्षक भागोजीशेठ किर यांच्या १५६ व्या जयंती निमित्त जन्मोत्सव सोहळा मुंबई ( दादर) येथे संपन्न झाला. . नवीनचंद बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात बंगाल केमीकल नाका( सेंच्युरी बाजार)वरळी ते भागोजी कीर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी अशी भव्य रॅली काढण्यात आली. दादर चौपाटी येथे या रॅलीचा समारोप अभिषेक व अभिवादन सोहळ्याद्वारे झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भागोजीशेठ कीर यांच्या दातृत्वशील जीवन चरीत्राविषयक मार्गदर्शन केले. त्यांना राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी हिंदू रक्षक असे संबोधले होते.
यावेळी भागोजी शेठ कीर स्मृती समितीचे अध्यक्ष किशोर केळसकर, पाचलेगावकर महाराज समाज सेवा समितीचे कार्यवाह कांत सावंत , भागोजी कीरांचे वंशज विलास कीर, . धनंजय कीर, दशरथ कीर, . राकेश फोडकर, . जगदीश आडवीकर आणि भागोजीशेठ कीर जन्मोत्सव कृती समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी कांत सावंत म्हणाले की, भागोजीशेठ कीर यांना थोर राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांनी हिंदू धर्मरक्षक ही पदवी बहाल केली होती. हिंदू बांधवांनी या सोहळ्यातील रॅली व सभेला उपस्थिती दर्शवली उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांचे शिष्य व . भागोजीशेठ कीर कृती समिती उपाध्यक्ष कांत सावंत यांनी माध्यमांद्वारे समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)