राजन तेली यांच्या उबाठा शिवसेनेत प्रवेशाने भाजपचे कोणतेही नुकसान नाही.
भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी.
बांदा | राकेश परब : भाजप माजी जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. सावंतवाडी मतदारसंघात भाजपला मानणारे मतदार विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यावेळी चौथ्यांचा आमदार म्हणून निवडून येतील. म्हणजेच ते विजयाचा चौकार मारणार असल्याचे, बांदा मंडल सावंतवाडी भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी सांगितले. शेर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत धुरी बोलत होते. ते म्हणाले, गतकाळत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला. त्याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये. जनता सूज्ञ आहे विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. राजन तेली यांनी आता उबाठामधून निधी आणून मतदारसंघाचा विकास करून दाखवावा. भाजपचा निधी वापरून स्वतःता चा प्रचार करणे योग्य नाही, असे महेश धुरी म्हणाले.
महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक केसरकर रिंगणात आहेत. त्यांना बहुमतांनी निवडून आणण्याचे आमचे लक्ष आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन भाजप बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)