ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'कोमसाप'चे वाङमयीन पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'कोमसाप'चे वाङमयीन पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 05 Nov 2024 07:37 AM
वाचन संख्या 67

केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी केली पुरस्कारांची घोषणा.

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : कोकणात लेखन, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ‘कोमसाप’ने चळवळ सुरू केली. यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पुरस्कार देतो. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी खूप उच्च दर्जाची पुस्तके पुरस्कारासाठी आली. त्यातून पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी दिली.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे २०२२ – २३ चे वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारांची कीर यांनी घोषणा केली. कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या काश्मीर कनेक्शन या कादंबरीला, द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार नागू वीरकर लिखित हेडाम कादंबरीसाठी, कथा विभागात प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार मनोज नाईक साटम यांच्या त्या वळणावर, तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ब्रेकिंग न्यूज कथासंग्रहाला जाहीर झाला.

कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार राजीव जोशी यांच्या शतकोत्तरी ओरखडा, तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार रेश्मा राणे जाधव यांच्या एका सावलीचा शोध या कवितासंग्रहाला, आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार अशोक बेंडखळे यांच्या महाराणी येसूबाई या संग्रहास, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार डॉ. स्मिता दातार यांच्या फक्त तिच्यासाठी या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. सोमनाथ कदम यांच्या प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक या ग्रंथास, नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या पुन्हा एकदा नव्याने जगायचंय मला या नाटकाला, ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार निर्मला रणजित शेवाळे यांच्या करंजमाळ या ग्रंथास, तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉ. मंजूषा कुलकर्णी यांच्या एक पाती गवताची या ललित ग्रंथास, बालवाङमय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार स्टॅनली गोन्सालवीस यांच्या मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा या ग्रंथास, संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार रमेश धनावडे यांच्या कवितेच्या सुरातून यास, तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सुखद राणे यांच्या इथे देशीचे या ग्रंथास आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार डॉ. आशुतोष रावीकर यांच्या भारताचे परकीय या ग्रंथास मिळाला आहे. विशेष पुरस्कार अनुक्रमे मराठी सातासमुद्रापार यासाठी मेघना साने, केमिस्ट्री कथासंग्रहासाठी रामदास खरे आणि शेवटची लिओग्राफी या कादंबरीसाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांना जाहीर झाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स