ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अतीवृष्टीमुळे बाधीत कोकणातील भातशेती व बागायतीच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात येऊन सरकार दरबारी याचा अहवाल सादर करण्यात यावा.

अतीवृष्टीमुळे बाधीत कोकणातील भातशेती व बागायतीच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात येऊन सरकार दरबारी याचा अहवाल सादर करण्यात यावा.

प्रकाशन: 24 Oct 2024 05:42 PM
वाचन संख्या 164

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची शासनाच्या गवर्नर कडे मागणी.

लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेजचीही कृषीमंत्र्यांसोबत करणार चर्चा.

मालवण | प्रतिनिधी : कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व वाऱ्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणा मध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती ही केले जाते व शेतकऱ्याचे मुख्य आर्थिक स्तोत्र त्याच्यावरच अवलंबून असते. भात पीक तयार झालेले असताना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे शेती जमीनदोस्त होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा व काजू उत्पादन याच्यावरही मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे फरक पडणार आहे. कोकणातील भात शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र असल्यामुळे यांना आर्थिक मदत सरकारमार्फत करण्यात यावी नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात येऊन सरकार दरबारी याचा अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे गव्हर्नर यांच्याकडे माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी केली आहे.

अशा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्यात यावे याबाबत चर्चा व मागणी गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे देशाचे कृषिमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स