ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
खालून उच्च विद्युतभारीत वाहिनी आणि वर खड्ड्यात साचलेले पाणी अशी कोकण रेल्वेच्या 'त्या' उड्डाणपुलाची स्थिती.

खालून उच्च विद्युतभारीत वाहिनी आणि वर खड्ड्यात साचलेले पाणी अशी कोकण रेल्वेच्या 'त्या' उड्डाणपुलाची स्थिती.

प्रकाशन: 20 Oct 2024 01:44 AM
वाचन संख्या 150

वेत्ये – सोनुर्ली मार्गांवरील या पुलावर अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल.

मळगांव | प्रतिनिधी : वेत्ये गावातून सोनुर्ली येथे जाण्यासाठी बनवलेला कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल सध्या धोकादायक बनला आहे. वेत्येमधील कोकण रेल्वेचा उड्डाणपूल हा मळगांव, वेत्ये व सोनुर्ली या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोनुर्ली, न्हावेली, निरवडे व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते. गेल्या दोन – तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचून उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे, या उड्डाणपुलाखाली कोकण रेल्वेची उच्च विद्युतभार क्षमतेची वाहिनी तथा लाईन असल्याने त्या उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. हा पुल कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकण रेल्वे यांनी यापुलाची पाहणी करून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पुढील महिन्यात सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरचा जत्रोत्सव देखील होणार आहे. त्यावेळी या उड्डाणपूलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. अशा धोकादायक उड्डाणपुलावरुन प्रवास करताना अपघात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सोनुर्ली, वेत्ये, मळगांव, निरवडे गावातील नागरीकांनी विचारला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स