मालवणात नेते निलेश राणेंच्या हस्ते बंदरजेटी रस्ता सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन.
मालवण | ब्युरो न्यूज : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या वतीने मालवण बंदर जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी निधी मंजूर झाला असून निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर, राजू बिडये, दामोदर तोडणकर, निशय पालेकर, आबा हडकर, शर्वरी पाटकर, संदीप भोजने, नारायण लुडबे, विक्रांत नाईक यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)