ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदिवडे साठी एसटी फेरीची मागणी ; बांदिवडे ग्रामस्थ संघाने वेधले एस टी विभाग नियंत्रकांचे लक्ष.

बांदिवडे साठी एसटी फेरीची मागणी ; बांदिवडे ग्रामस्थ संघाने वेधले एस टी विभाग नियंत्रकांचे लक्ष.

प्रकाशन: 21 Aug 2024 07:57 PM
वाचन संख्या 414

मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत एसटीच्या फेरी बाबत निवेदन दिले. कणकवली आगारातून बांदिवडे साठी सकाळी ९:१५ वाजता सुटणारी फेरी कोरोना कालावधीपासून बंद करण्यात आली आहे. ही फेरी रेल्वेने येणारे चाकरमानी, ग्रामस्थ तसेच शालेय विध्यार्थ्यांना सोयीची होती. या मार्गांवरील गोठणे, रामगड, श्रावण, आडवली आदी गावातील ग्रामस्थ सुद्धा या फेरीवर अवलंबून होते. ही फेरी चालू करण्याबाबत यापूर्वी सुद्धा अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. परंतु कार्यवाही होत नसल्याने बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने विभाग नियंत्रक यांची भेट घेत याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्री आनंद परब, विलास परब, बंदिवडे सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, उदय सावंत, चंद्रकांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब , हरेश परब, सत्यवान सावंत आदी उपस्थित होते. तसेच सध्या बांदिवडे साठी दोन एसटी फेऱ्या चालू असून या दोन्ही फेऱ्या वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बांदिवडे येथून नियोजित वेळेआधी सकाळी सुटणारी फेरी पहाटे ६ वाजता सोडण्यात यावी तसेच कणकवली येथून सायंकाळी सुटणारी फेरी वेळेवर सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

पहाटेची फेरी पाच मिनिटे वेळे आधीच सुटत असल्याने कणकवलीतील महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गाडीचा पर्याय नसल्याने शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे यावेळी विभाग नियंत्रक श्री पाटील यांनी आश्वासीत केले. गणेश चतुर्थी पूर्वी सकाळी ९:१५ वाजता सुटणारी फेरी चालू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स