ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पानिपतचे विश्वासजी  ऐतिहासिक मसुरे भरतगडावर...!

पानिपतचे विश्वासजी ऐतिहासिक मसुरे भरतगडावर...!

प्रकाशन: 21 Oct 2021 12:59 PM
वाचन संख्या 58

पानिपतकार ,ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक श्री विश्वास पाटील यांनी घेतली मसुरे गावाची भेट..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कसबा मसुरे येथील ऐतिहासिक किल्ले भरतगड आणि सरदार मुळीक प्रभुगांवकर वाड्याला इतिहास संशोधक पानिपतकार,प्रसिद्ध लेखक श्री विश्वास पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावरती सर्वत्र फिरून ऐतिहासिक गोष्टींची माहिती करून घेतली. तसेच मसुरे येथील सरदार मुळीक प्रभुगांवकर यांच्या जुन्या वाड्याला ही भेट दिली. प्रभुगावकर यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक वस्तूंची आणि जुन्या काळातील लिखित स्वरूपाची माहिती संग्राम प्रभुगावकर यांनी विश्वास पाटील यांना दिली. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, मसुरे गांव, भरतगड किल्ला आणि या प्रभुगांवकर वाड्याला इतिहासात मोठे मानाचे स्थान आहे. या संदर्भात लेखन करण्यासाठी आणि या कसबा मसुरे गावाची, इतिहासात प्रसिद्ध अशा भरतगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती पुढे आणण्यासाठी लवकरच पुन्हा एकदा भेट देणार असल्याचे बोलताना सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रभुगावकर वाड्यातील ज्येष्ठ सदस्य संग्राम प्रभुगावकर यांनी इतिहासातील विविध अवशेष, भरतगड किल्ल्याविषयी माहिती, मसुरे गावाचा जुना इतिहास,येथील प्राचीन मंदिरे आणि सरदार मुळीक प्रभुगावकर वाड्यातील जुन्या काळातील काही वस्तू यांची विश्वास पाटील यांना माहिती दिली. विश्वास पाटील यांनी संग्राम प्रभुगावकर यांना ऐतिहासिक ” संभाजी ” कादंबरी भेट म्हणून देऊन पुन्हा लवकरच मसुरे गावास भेट देण्याचे अभिवचन दिले. यावेळी त्यांच्यासोबत, संग्राम प्रभुगावकर, श्रीमती तोरस्कर मॅडम, श्रीयुत निकम सर समीर प्रभुगावकर,सुनील प्रभुगावकर, शिरीष प्रभुगावकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स