ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात १९ ऑगस्टला भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅलीचे आयोजन...
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात १९ ऑगस्टला भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅलीचे आयोजन...

प्रकाशन: 17 Aug 2024 09:16 AM
वाचन संख्या 53

बाबा मोंडकर ; तालुक्यातील रिक्षा व्यवसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

मालवण, ता. १४ : नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिकमहासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण शहरातून भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, तसेच यानिमित्त रिक्षा सजावट स्पर्धाही घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबा मोंडकर यांच्यासमवेत पर्यटन महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश जावकर, रिक्षा संघटना अध्यक्षा पप्या कद्रेकर, पूजा सरकारे, किशोर दाभोलकर, रवींद्र खानविलकर, दर्शन वेंगुर्लेकर, निलेश लुडबे, वरद धुरी, दीपक बांदकर, धनेश हडकर, राजा मांजरेकर, प्रसाद वराडकर, हेमंत कांदळकर, राजू डिंगणकर, ऐश्वर्य मांजरेकर, प्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.श्री. मोंडकर म्हणाले, मालवण हे पर्यटन शहर असून रिक्षा व्यावसायिक हे पर्यटनाचा महत्वाचा दुवा आहेत. म्हणूनच येथील संस्कृती व पर्यटन सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या रॅलीचे तिसरे वर्ष आहे. या रॅलीत तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक सहभागी होणार आहेत. नारळी पौर्णिमेदिवशी दुपारी ३ वाजता भरड नाका येथून मालवण बंदर जेटी पर्यंत रॅली काढण्यात येणार असून रॅली नंतर श्रीफळाची पूजा अर्चा करून श्रीफळ सागराला अर्पण करण्यात येणार आहे. या रॅली निमित्त रिक्षा सजावट स्पर्धा देखील आयोजित केली असून यासाठी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी बक्षिसे पुरस्कृत केली

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी बक्षिसे पुरस्कृत केली आहेत. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी रिक्षा व्यवसायिकांनी आपली रिक्षा पारंपरिक पद्धतीने तसेच पर्यावरण पूरक पद्धतीने सजविणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिक्षा व्यवसायिकांनी पप्या कद्रेकर ९८२३०९६१५६, रवींद्र खानविलकर (तारकर्ली) – ९८६००१३२३८ व हेमंत कांदळकर ९४२१२६३०३९ यांच्याशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी श्री. मोंडकर यांनी केले.आहेत. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी रिक्षा व्यवसायिकांनी आपली रिक्षा पारंपरिक पद्धतीने तसेच पर्यावरण पूरक पद्धतीने सजविणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिक्षा व्यवसायिकांनी पप्या कद्रेकर ९८२३०९६१५६, रवींद्र खानविलकर (तारकर्ली) – ९८६००१३२३८ व हेमंत कांदळकर ९४२१२६३०३९ यांच्याशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी श्री. मोंडकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स