ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

प्रकाशन: 03 Aug 2024 11:23 PM
वाचन संख्या 82

रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा घेतला आढावा, ग्रामिण रुग्णालयासाठी करणार प्रयत्न

राकेश परब बांदा |

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर सेवा यांचा आढावा घेण्याकरीता आज बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग व मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत चर्चा केली.

बांदा दशक्रोशीच्या लोकसंख्येचा व दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता आवश्यक सोईसुविधा नसल्याने रुग्णांना गोवा राज्यात पाठवावे लागते. ज्यात योग्य वेळी उपचार न मिळाल्याने अनेकदा रुग्णांचा मृत्यू देखील होतो.त्यामुळे याचा गांभीर्याने विचार होऊन येथे किमान ३० कॉटचे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे, असे यावेळी शिष्टमंडळार्फे सांगण्यात आले. तसेच त्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला परिचारकाची नेमणूक नसल्याने शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला रुग्णांना त्याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो हे देखील यावेळी गुरु कल्याणकर यांनी निदर्शनास आणून दिले. व महिला परिचारकाची मागणी केली.त्याचप्रमाणे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिपाई व सफाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची देखील मागणी करण्यात आली. दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा ज्येष्ठ नागरिकांकरिता रक्तदाबाच्या गोळ्या, रेबीज व सर्पदंशावरील इंजेक्शन्सची कमतरता, गरोदर माता यांना आयरन व कॅल्शियमच्या गोळ्या अशा अनेक औषधांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावर वैद्यकीय अधिकारी यांना त्वरीत मा.पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे नावाने मागणीपत्र तयार करण्यास सांगितले. सदर मागणीपत्र पालकमंत्री यांना सादर करून सर्व अडचणी दूर करण्याबाबत मागणी करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी त्यांनी दाखल झालेल्या रुग्णांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांची देखील विचारपूस केली गेल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच राजाराम सावंत, माजी पंचायत समिती सभापती शीतल राऊळ, माजी उपसरपंच जावेद खतीब, गुरु कल्याणकर, निलेश उर्फ पापु कदम, बाबा काणेकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत,शैलेश केसरकर, व्यंकटेश उरुमकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेली टेलीमेडिसीन सारखी व्यवस्था बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.ज्याद्वारे हृदयरोग, किडनी व इतर गंभीर रोगांवरील रुग्णांची इसीजी व इतर महत्त्वाची तपासणी करून त्वरित मुंबई,पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाइन तपासणी करून लगेचच औषधे दिली जातात.परंतु याची माहिती नागरिकांना न मिळाल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तरी बांदा दशक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या व्यवस्थेचा उपयोग करावा – प्रियांका नाईक, सरपंच, बांदा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स