धान्यपुरवठ्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी घातले लक्ष..!
मालवण |
मालवण तालुक्यातील धान्य दुकानात ऑनलाईन धान्य मिळण्यासाठी गेल्या चार दिवस लोकांना धान्यासाठी हेलपाटे मारून देखील धान्य मिळत नव्हते आमदार वैभव नाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करता लगेचच जिल्हा पुरवठा अधिकारी बैनाडे मॅडम यांनी मालवण तालुक्यातील धान्य दुकानांना जुलै चे धान्य ऑफलाईन पद्धतीने देण्याचे आदेश दिले आणि उद्याचा दिवसात धान्य उचलण्याचे आवाहन मालवण तालुक्यातील लोकांना केले आहे. ही सुविधा आमदार श्री.वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांचा आमदार ही त्यांची ओळख अधोरेखित झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)