ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी वीजेच्या लपंडावाबद्दल व्यक्त केली नाराजी ; व्यावसायिक व सामान्यांचे अतोनात हाल होत असल्याची व्यक्त केली खंत.

युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी वीजेच्या लपंडावाबद्दल व्यक्त केली नाराजी ; व्यावसायिक व सामान्यांचे अतोनात हाल होत असल्याची व्यक्त केली खंत.

प्रकाशन: 10 Jan 2024 10:02 PM
वाचन संख्या 234

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात आज १० जानेवारीला दिवसभर व विशेष करून दुपारनंतर झालेल्या विजेच्या लपंडावाबद्दल युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजेच्या अशा वारंवार दीर्घ अवधीसाठी खंडित होण्याने सध्या दिवसाचा वाढता उकाडा, आर्द्रता तसेच व्यापारी व व्यावसायिक वर्गासाठी सुद्धा पंचाईत होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. सध्या बहुतांश इंटरनेट संदर्भातील अत्यावश्यक संदेश वहनाची कामेसुद्धा डिजीटल कामेसुद्धा वायफाय वर अवलंबून असल्याने त्या कामांमध्येही वारंवार व्यत्यय येत असल्याने शैक्षणिक गोष्टींवरही त्याचा परिणाम होत आहे असे युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी स्पष्ट केले आहे.

हा विजेचा खंडित होण्याचा खेळखंडोबा थांबवण्यात यावा अन्यथा याबाबत नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यात तीव्र नाराजी निर्माण होऊन कुठलीही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास याला वीज मंडळ सर्वतोपरी जबाबदार राहील असे त्यांनी स्पष्ट केले. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळाने बहुतांश डागडुजी, दुरुस्ती करुन मालवणात वीज समस्या भेडसावू नये ही काळजी घेतली होती तशीच काळजी नियमीतपणे सामान्य नागरिकांसाठी व मालवणात येणार्या पर्यटकांसाठी घेतली गेली तर वीज मंडळाची प्रशंसाच केली जाईल असेही सौ. शिल्पा यतीन खोत यांनी सांगितले आहे. जर तांत्रिक दुरुस्ती व बिघाड असेल दोनच दिवसांपूर्वी सोमवारी वीज मंडळाचे साप्ताहिक लोडशेडिंग तथा वीज पुरवठा खंडीत केलेला असताना त्यादिवशीच सर्व कामे मार्गी लावणे अपेक्षित असताना हा रोजचा अध्येमध्ये मध्ये होणारा वीजपुरवठा गृहिणींच्याही अनेक दैनंदिन कामांचा प्रचंड खोळंबा करतो अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स