ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनात योगदान द्या – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनात योगदान द्या – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

प्रकाशन: 07 Dec 2023 05:50 PM
वाचन संख्या 44

ब्युरो न्यूज/रत्नागिरी : देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने येथील अल्प बचत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज झाला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष परब आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सन http://localhost/news/public/uploads/2023 साठी आपल्या जिल्हयाने आतापर्यंत 86 टक्के निधी संकलनाचे उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही 61 लाख 18 हजार रुपयांचे उद्दिष्ट्य आपण सर्वजज मिळून पूर्ण करु या. मागील वित्तीय वर्षात 23 लाख 52 हजार 120 रुपयांची मदत विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, सैनिकांप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात शिस्त पालन असणे आवश्यक आहे. 86 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याचा आनंद असला तरी सर्वांनी निधी संकलनास आपले योगदान देवून 100 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करुन जिल्ह्याला अग्रेसर ठेवा. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती, त्यांच्या कुटुबांप्रती निधी देवून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. स्वच्छता, व्यायाम, योग्य आहार यामधून निरोगी जीवन जगण्यासाठी सैनिकांच्या शिस्तीचे विद्यार्थ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. वीर माता छाया कदम, शौर्य पदक धारक नायक बजरंग मोरे, माजी सैनिक अरुण आठल्ये, युध्द विधवा, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त आदींचा तसेच निधी संकलनास योगदान देणाऱ्या विभागांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सैनिकी मुलींच्या वस्ती गृहातील मुलींनी आणि अंजली लिमये यांनी यावेळी देश भक्तीपर गीते गायिली. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सुभेदार लक्ष्मण गवळी यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स