ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वैभववाडी तालुक्यातील पहिला कच्चा बंधारा बांधून रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नावळे ग्रामपंचायत यांनी आदर्श निर्माण केला.- गविअ श्री मनोजकुमार बेहरे

वैभववाडी तालुक्यातील पहिला कच्चा बंधारा बांधून रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नावळे ग्रामपंचायत यांनी आदर्श निर्माण केला.- गविअ श्री मनोजकुमार बेहरे

प्रकाशन: 03 Dec 2023 06:31 PM
वाचन संख्या 35

वैभववाडी/ नवलराज काळे: पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहिम सक्षम रित्या राबविण्यासाठी नोव्हेंबर पासून कच्चे बंधारे बांधून पाणी अडविण्याची विशेष मोहिम राबविली जाते. वैभववाडी तालुक्यामध्ये रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नावळे ग्रामपंचायत यांनी नावळे येथे कच्चा बंधारा बांधून या मोहिमेची चांगली सुरुवात केल्या बध्दल पंचायत समिती वैभववाडी चे गटविकास अधिकारी श्री मनोजकुमार बेहरे यांनी बंधा-याला प्रत्यक्ष भेट देऊन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ ग्रामपंचायत नावळे यांचे विशेष कौतुक केले.

वैभववाडी तालुक्यातील नावळे येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व ग्रामपंचायत नावळे यांच्या वतीने नावळे नदीवर कच्चा बंधारा बांधणेत आला. या वेळी सरपंच कु.सोनल गुरव, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री.संजय रावराणे, ट्रेझरर श्री प्रशांत गुळेकर, चार्टर्ड प्रेसिडेंट श्री.संतोष टक्के, रोटरियन विध्याधर सावंत, सचिन रावराणे, मुकुंद रावराणे, मंगेश कदम, बंडया सावंत, संजय सावंत, प्रशांत कुळये, तेजस आंबेकर,ग्रामसेवकश्री घुगे, ग्रा प सदस्य संजय शेळके, ग्रामस्थ विलास गुरव, रमेश गुरव, गणपत पाटील, भिकाजी गुरव, आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

नावळे येथे कच्चा बंधारा बांधल्याने या ठिकाणी माठया प्रमाणात पाणीसाठा होणार असून शेतीसाठी याचा शेतक-यांना मोठा लाभ होणार आहे. तालुक्यातील पहिला बंधारा बांधण्यासाठी नावळे गावाची निवड करुन चांगल्या प्रकारचा बंधार बांधल्याबध्दल रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे व मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी यांनी प्रत्यक्ष बंधा-याच्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केल्या बध्दल सरपंच कु. सोनल गुरव यांनी आभार माणले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स