डाॕ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या प्रथम फेरीत मालवणचा योगेश परूळेकर अव्वल !
मालवण /प्रतिनिधि : मुंबईतील विज्ञान शिक्षक परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रज्ञाशोध स्पर्धेच्या पहिल्या लेखी परीक्षा फेरीत मालवणच्या जय गणेश इंग्लीश माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणा-या योगेश नितिन परूळेकर हा विद्यार्थी अव्वल दर्जाने यशस्वी झाला आहे.योगेशला लहानपणापासूनच विज्ञानामध्ये रस असल्याचे श्री.नितीन परूळेकर यांनी सांगितले.टी,व्हीवरील विज्ञान विषयक कार्यक्रम तो रस घेऊन पाहतो.श्री.परूळेकर स्वतः विज्ञान शिक्षक असल्याने त्यांचे आणि घरातील सदस्यांचे योगेशला मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत असतो.या पुढच्या प्रात्यक्षिक आणि मुलाखत या फे-यांतही त्याला यश मिळेल असा विश्वास योगेशच्या पालक आणि शिक्षकांना वाटत आहे.योगेशचा मालवणवासियांना सार्थ अभिमान असून भावी संशोधक म्हणूनही त्याने आशा निर्माण केली आहे.आपली सिंधुनगरीकडून योगेशचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील फे-यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)