ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित आकाशकंदील स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित आकाशकंदील स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद

प्रकाशन: 07 Nov 2023 02:27 PM
वाचन संख्या 60

बांदा /राकेश परब: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे लहान मुलांसाठी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास 100 मुलांनी भाग घेत स्पर्धा यशस्वी केली. यावेळी एकूण 10 विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेप्रथम क्रमांक – सिमरन सागर बांदेकरद्वितीय क्रमांक – प्राची प्रसाद यादवतृतीय क्रमांक – शुभ्रा सागर तेलीचतुर्थ क्रमांक – तनिष्का संदीप देसाईपाचवा क्रमांक – हर्षल श्यामसुंदर वरगतसेच शिवम राजन कदम, नाजुका आरिफ खान, साईश सागर बांदेकर, आर्या पिराजी शिंगाडे, आर्या दत्ताराम चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, शिवम गावडे, विनिता कुबडे ईश्वरी कल्याणकर, शाळेचे शिक्षक जे. डी. पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते. आजकाल बाजारात प्लास्टिक आकाशकंदील सहज उपलब्ध होत असल्याने मुलांना पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्याचे रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी म्हटले. आभार जे. डी. पाटील सर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स