विजेचा धक्क्याने सरमळे येथे एकाचा मृत्यू ..!
बांदा | राकेश परब : श्री गणेशोत्सवासाठी गणपतीची सजावट आरास करताना विजेचा धक्का लागल्यामुळे सरमळे-देऊळवाडी रमाकांत शिवराम परब यांचे निधन झाले . ते ५० वर्षांचे होते. आज सकाळी ९ वाजता घडली. गणेश चतुर्थीच्या तोंडावरच रमाकांत यांचे अकाली निधन झाल्याने परब कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या गणेश चतुर्थीची तयारीची लगबग सुरु असल्याने रमाकांत हे घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते तोल जाऊन खाली जमिनीवर पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले.
रमाकांत परब हे मुंबई गोवा खासगी आराम बसमध्ये क्लीनर म्हणून कामाला होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांदा आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बांदा आरोग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)