ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एका सलुन व्यावसाईकांच्या दुकानाची तोडफोड हे निंदनीय कृत्य : राज्यसंघटक चव्हाण

एका सलुन व्यावसाईकांच्या दुकानाची तोडफोड हे निंदनीय कृत्य : राज्यसंघटक चव्हाण

प्रकाशन: 18 Jul 2023 11:01 PM
वाचन संख्या 75

श्रावण: प्रतिनिधी /गणेश चव्हाण : वेंगुर्ले बाजारपेठ येथील सलुन व्यावसाईक शंकर सदाशिव पवार यांना गेले दोन दिवस दमदाटी व धमकी करत १६ जुलै रोजी, सलूनची तोडफोड करुन, मोठे नुकसान केले. हि बाब समाज घातक असुन एका व्यावसाईकांना गरीबीच्या दरीत घालण्यासारखा वाईट प्रकार असल्याने आम्ही अशा घटनांचा निषेध करतो . असे नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय सि. चव्हाण यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केले.

१९९३ पासुन शंकर सदाशिव पवार सलुन व्यवसाय करुन आपला धंदा करत होते. जमिनीचा मालकां कडुन करार केलेला होता. गेली ३० वर्ष सदर मालकांचा काहिही त्रास नव्हता. पण दोन दिवस अचानक जमिन मालक शंकर पवार यांना दुकान खाली करण्यासाठी दमदाटी व धमकी द्यायला लागले. आणि १६ जुलै रोजी अचानक सलुन दुकानाची तोडफोड केली. याबाबत विजय चव्हाण यांनी पवार यांची विचारपूस करुन आपण पाठीशी असल्याचे सांगत या कृत्त्याचा निषेध नोंदवला.

नाभिक संघटणेचे जिल्हाध्यक्ष जगदीश सुभाष चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर तसेच जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० नाभिक पदाधिकारी व बांधवांनी वेंगुर्ले येथे धाव घेतली. आपल्या समाज बांधवाची काहीही चुक नसतांना, तसेच जागेचा भाडे करार, असतांना, मनमानी करत दुकान फोडले त्यामुळे पोलीसांनी, योग्य चौकशी करुन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी भुमिका, जिल्हा नाभिक संघटणेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण व युवाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांनी घेतली. अणि तसा अर्ज सादर केला. अर्जात असे म्हटले आहे की शंकर पवार यांना योग्य न्याय मिळावा व आरोपींना शिक्षा करुन नुकसान भरपाई वसुल करावी अशा प्रकारचा अर्ज सादर केला.

यावेळी कुडाळ अध्यक्ष आनंद पिंगुळकर, मालवणचे शुभम लाड, वेंगुर्लेचे किरण पवार, नाभिक संघटणा उपाध्यक्ष संदिप चव्हाण, मालवण युवा तालुकाध्यक्ष संदिप लाड व बरेच नाभिक बांधव उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स