ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी.

प्रकाशन: 26 Jun 2023 09:33 PM
वाचन संख्या 43

मसुरे/ प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची संरक्षक भिंत बिळवस वरचा वाडा येथील बाळू माधव यांच्या घरा नजीक रविवारी सकाळी खचल्याने हा छोटा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याबाबत रविवारी दुपारी पावसाची संततधार असतानाही बीळवस सरपंच मानसी पालव यांनी खचलेल्या रस्त्याची भर पावसात पाहणी केली. येथील ग्रामस्थ बाळू माधव आणि येथील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून खचलेल्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीसाठी आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे तसेच संबंधित सर्व अधिकारी वर्गाला ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव पाठवून याबाबत त्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच निधी उपलब्ध होताच प्राधान्याने या ठिकाणचे काम करण्यात येईल असे यावेळी सांगितले.. तसेच सोमवारी सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे दूरध्वनी द्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे. या ठिकाणच्या कामासाठी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही सरपंच मानसी पालव मॅडम यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर या रस्त्यावरती बाळू माधव यांच्या घरा नजीक नुकत्याच सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर छोटा रस्ता खचला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

फोटो. बीळवस येते खचलेल्या रस्त्याची पाहणी करताना बिळवस सरपंच मानसी पालव आणि ग्रामस्थ…

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स