ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विनोद आईर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विनोद आईर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

प्रकाशन: 26 Jun 2023 08:26 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित स्वामी समर्थ मठ हडपिडचे गाव समिती सचिव विनोद बाबू आईर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन ओरोस येथे सन्मानित करण्यात आले. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड यांच्या वतीने द्वितीय राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार वितरण २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन श्री देव रवळनाथ रंगमंच ओरस (सिंधुदुर्गनगरी) या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी सदर पुरस्कार वितरण या संस्थेचे अध्यक्ष सुनिल फडतरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिलीप मेस्त्री,ज्ञानदेव मेस्त्री,महेश जुवाटकर, डॉ अभिनंदन मालंडकर,सुहास परब चंद्रकांत ओरसकर,माळी सर,प्रभाकर सावंत, सावंत सर,आदी मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स