ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

प्रकाशन: 21 Jun 2023 05:15 PM
वाचन संख्या 88

बांदा /राकेश परब: आजचे गुणवंत विद्यार्थी हे उद्याचे या देशाचे भविष्य असून या विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करून आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे कौतुकोदगार बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांनी येथे काढले. येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. तोरसकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत, पर्यवेक्षक एन जी नाईक, उच्च माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक पी. यू. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थी निशांत नाईक, कौस्तुभ सावंत, इशिता सावळ, इतिहास राज्यशास्त्र विषयात २ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविल्याबद्दल विषय शिक्षक सूर्यकांत सांगेलकर, संस्कृत विषयात ५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविल्याबद्दल विषय शिक्षिका शामल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेत विज्ञान विभागात प्रवण नाईक, अशोक मयेकर, श्रावणी देसाई, कला विभागात सुगंधा गावडे, तन्वी वझे, वैशाली राऊळ, वाणिज्य विभागात जतीन देसाई, शालिनी नाईक, पुजाकुमारी माळी, हॉर्टिकल्चर विभागात रितेश राणे, दत्ताराम बांदेकर, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग विभागात शांताराम सावंत, गोविंद सावंत, अश्विनी घाडी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात सिद्धेश गवस, सचिन देसाई, आयुष दळवी या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक यांनी मनोगत व्यक्त केलीत. तसेच शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत सांगेलकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स