<em>ग्रामपंचायत बिबवणे येथे कोकण संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न</em>
बांदा : राकेश परब
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत बिबवणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वित्त आयोगांतर्गत दिनांक ०७ जून २०२३ रोजी बिबवणे ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले . या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ . श्रुती कुडपकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . यावेळी सौ. अन्वी शिरोडकर (ग्रामसेवक) , श्री. समिर शिर्के (समन्वयक- कोकण संस्था ), श्री. लक्ष्मण देसाई , श्री मिनरवास परब, डॉ. तेली ,श्री. प्रदीप पवार , श्री. उमेश गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरामध्ये गावातील महिला व पुरुषांची रक्त तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली .यामध्ये एकूण ५४ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला . सरपंच सौ . श्रुती कुडपकर यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापुढेही चांगल्या शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले . ग्रामसेवक सौ. अन्वी शिरोडकर यांनी आरोग्य शिबिरास शुभेच्छा दिल्या व कोकण संस्थेचे संस्थापक श्री. दयानंद कुबल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक केले. कोकण संस्थेच्या वतीने श्री. समिर शिर्के यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)