बिळवस ग्रामपंचायत इमारत बांधकामाचा भूमिपूजनाने शुभारंभ...!
बांधकामासाठी श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव व कुटुंबियांनी विनामूल्य दिली पाच गुंठे जमीन….!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजने अंतर्गत बिळवस गावच्या ग्रामपंचायत इमारत कामाचा शुभारंभ बिळवस टेलिफोन कार्यालया नजीक नुकताच करण्यात आला. श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव व कुटुंबियांनी पाच गुंठे जमीन इमारत बांधकामासाठी विनामूल्य दिल्याबद्दल गावाच्या वतीने सरपंच सौ मानसी पालव यांनी जानकीबाई पालव यांचे आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी पालव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, रंजना पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगांवकर, पोलीस पाटील गोविंद सावंत, बिळवस ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सूर्यकांत पालव, महादेव पालव, पंढरीनाथ पालव, मनोज पालव, गोपाळ पालव, रवींद्र पालव, अशोक पालव, चेतन पालव, भास्कर पालव, चंद्रकांत पाताडे,रामकृष्ण पालव, पांडुरंग पालव, कृष्णकुमार पालव, संजय पालव, भाई सावंत, दीपक पालव, रोशन पालव, सुरेंद्र पालव, रामचंद्र मदन पालव, प्रल्हाद नाईक, सुधीर पालव,रामलक्ष्मण पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सदस्य संतोष पालव यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)