ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'श्रीरंग'तर्फे झाला माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा ; वालावलात संपन्न झाला प्रशंसा सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'श्रीरंग'तर्फे झाला माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा ; वालावलात संपन्न झाला प्रशंसा सोहळा.

प्रकाशन: 14 May 2023 11:08 AM
वाचन संख्या 233

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राज्यातील अंध, दिव्यांग, ॲसिड व्हिक्टिम सहित विविध वंचित घटकांसोबत काम करणारी श्रीरंग फाऊंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. हा कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण देवालय येथे झाला. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पांरपारीक लोककलेला एक वेगळी ओळख देत त्या कलांच संवर्धन करणारी लोककला बोलीभाषा जपणारी अर्चना आणि तिची माय, आपली संस्कृती जपणाऱ्या नऊवारी साडी नेसुन आजपर्यंत नव्वदच्यावर किल्ले सर केलेल्या सुवर्णा वायंगणकर आणि तिची माय, जगातल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रत्येकाच्या वेदनेवर मायेचं मलम लावणाऱ्या श्रद्धा ताई आणि त्यांची माय, वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगावर मात करत स्वत:चा ‘तळेकरीण’ ब्रॅण्ड निर्माण करणारी वर्षा तळेकर आणि तिची माय, तृतीयपंथीय असुनही उच्चशिक्षित बनून स्वताची वेगळी ओळख बनवणारी निष्ठा निशांत आणि ह्या सगळ्या प्रवासात आपल्या मुलीला भक्कम आधार देणारी तीची माय. अशा मायलेकींच्या कर्तृत्वाचा सन्मान यावेळी करण्यात आला.मायलेकींच नात हे जगाला माया, ममता, करुणेसह जिद्द, कर्तृत्वही दाखवतं हे या मायलेकींच्या कहाणीतून दिसते. त्यांची कहाणी जगासमोर यावी, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, यासाठी श्रीरंग फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याचे संस्थापक सुमीत पाटील सांगतात.यावेळी सत्कार मूर्तींसह श्रीरंग फाउंडेशनचे संस्थापक सुमित पाटील, गुरू देसाई, प्रकाश चौधरी, विश्वस्त आणि वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स