ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी बदलली शासकीय सौंदर्याची दृष्टी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी बदलली शासकीय सौंदर्याची दृष्टी

प्रकाशन: 01 May 2023 02:28 PM
वाचन संख्या 26

मालवण | सुयोग पंडित: मालवण पंचायत समितीचे विश्रामगृह बंदरजेटी परिसरात असल्याने त्याठिकाणी ही सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी सीआरझेडचा फटका बसत आहे. मात्र, शासकीय इमारत उभी करण्यासाठी सीआरझेडमध्ये काही प्रमाणात सुट मिळविता येऊ शकते याचा अभ्यास करून एक परिपूर्ण आराखडा बनवून पंचायत समितीचेही विश्रामगृह सुसज्ज बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. दोन्ही विश्रामगृहातील काही कक्ष जर पर्यटनासाठी थेट वापरण्यास शासनाने परवानगी दिल्यास त्याचा फायदा विश्रामगृहाचे व्यवस्थापन सांभळण्यासाठी होऊ शकणार आहे. याकडे आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्यांचेहीआमदार नाईक म्हणाले. *कार्यकारी अभियंत्यांचे काम चांगले!* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सदरच्या प्रस्तावासाठी आवश्यक पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यासाठी लक्ष दिला आहे. यापूर्वीच शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता चांगल्याप्रकारे काम करीत असून त्यांच्या नियोजनामुळेच लवकरच मालवणातील शासकीय विश्रामगृह आणि आरसे महल या दोन्ही इमारती दिमाखात उभ्या राहणार आहेत, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स