ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तळेरेतील टपाल ऑफिसच्या भूखंडावर झाडाझुडुपांचे साम्राज्य..!

तळेरेतील टपाल ऑफिसच्या भूखंडावर झाडाझुडुपांचे साम्राज्य..!

प्रकाशन: 02 Oct 2021 11:27 PM
वाचन संख्या 180

सदर भूखंड वर्षानुवर्षे दुर्लक्षीत असल्याने नागरिकांत नाराजी…

तळेरे | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथे काही वर्षांपूर्वी तळेरे-कोल्हापूर राज्य मार्गालगत असलेला एक भूखंड शासनाने टपाल कार्यालयाच्या उभारणीसाठी संपादन केलेला आहे.

सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या माहितीनुसार ,सदर भूखंडास सभोवताली दगडी कंपाऊंड भिंत देखील बांधण्यात आलेली आहे. परंतु प्रदीर्घ कालावधी उलटून देखील सदर भूखंडावर टपाल कार्यालयाच्या उभारणीबाबत कोणतीच ठोस हालचाल व कार्यवाही शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर भूखंडावर सद्यस्थितीत झाडे-झुडपे यांचे साम्राज्य पसरले असून सभोवताली भंगार चीजवस्तू यांचे गोडाऊन निर्माण झाले आहे.

तळेरे सारख्या शहर वजा विकसनशील गावात जमिनीचे भाव वधारलेले आहेत. त्यामुळे शासनाने टपाल कार्यालयाच्या इमारत उभारणीसाठी संपादन केलेला सदर भूखंड वर्षानुवर्षे दुर्लक्षित ठेवणे हे योग्य नसून संबंधित जमीन मालकांवर अन्यायकारक आहे. तरी शासनाने एकतर सदर भूखंडावर सुसज्ज असे टपाल कार्यालय उभारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.

अथवा स्थानिक जीर्ण झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, जीर्ण रेशन दुकान व गोदाम याचप्रमाणे कृषी कार्यालय, महावितरण कार्यालय, पोलीस ठाणे, ट्रामा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय इ. यांपैकी कोणत्याही एक किंवा अनेक इमारतींच्या उभारणीसाठी सदर भूखंड संबंधीतांकडे हस्तांतरीत व आरक्षित करून सदर इमारतींच्या उभारणी बाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. अन्यथा शासनाने सदर भूखंड संपादित करताना नमूद केलेल्या प्रयोजनाच्या पूर्ततेबाबत आजतागायत कार्यवाही पूर्ण न केल्याने, सदर भूखंड संबंधित जमीन मालकांच्या ताब्यात मालकी हक्काने विनामोबदला तात्काळ हस्तांतरीत करावा अशी मागणी तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स