ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा 'अमरावती' येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश...
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा 'अमरावती' येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश...

प्रकाशन: 23 Apr 2023 01:00 PM
वाचन संख्या 25

संतोष साळसकर | शिरगांव: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचा इ.७ वी मधील कु. अथर्व आशिष जोशी याने १४ वर्षाखालील मुलांच्या 25 कि.ग्रॅ. वजन गटात कोल्हापूर विभागाच्यावतीने खेळताना त्याने राज्यस्तरावर कास्यपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.कु.अथर्व जोशी हा कासार्डे माध्यमिक विद्यालयात मोफत सुरू असलेल्या ‘ज्यूदो कराटे क्लासचा विद्यार्थी असून,आत्तापर्यंत त्यांनी विविधस्तरावर विजेते पद पटकावले आहे. या यशस्वी खेळाडूला कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, मुख्य प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, प्रशिक्षक सोनू जाधव यांच्यासह पालकांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. या गुणवंत खेळाडूचे अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले , सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांच्यासह महाराष्ट्र राज्य ज्युदोअसोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, टेक्निकल समितीचे सचिव इतर सर्व पदाधिकारी कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी,स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ज्युदो पट्टू अथर्व जोशीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स