ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विरण बाजारपेठ येथे वॉटर कुलरचे उदघाटन!

विरण बाजारपेठ येथे वॉटर कुलरचे उदघाटन!

प्रकाशन: 02 Apr 2023 12:48 PM
वाचन संख्या 352

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्रामपंचायत मसदे-चुनवरे वतीने १५ व्या वित्त आयोग निधी मधून विरण बाजारपेठ येथे उभारण्यात आलेल्या वॉटर कुलरचे (पाणपोई) उद्घाटन जिल्हा बँक संचालक – बाबा परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या सुविधेमुळे उन्हाळ्यात प्रवासी, ग्रामस्थांना थंड पाण्याची सोय झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, माजी जी प सदस्य अनिल कांदळकर,बाळा परब,विलास पांजरी, जितेंद्र परब कमलेश प्रभू, बाबू वाडकर, शर्मिका वाडकर, गुरुनाथ परब, दाजी परब व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल कांदळकर म्हणाले, यापुढे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकाभिमुख योजना राबवून विकास कामे पूर्ण होतील.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स