एक घोट पाणी, पशू-पक्षांसाठी" ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा स्त्यूत्य उपक्रम"
चिंदर/ विवेक परब : दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. या वाढत्या उन्हाचा तडाखा माणसाबरोबरच चिमण्या पाखरांनाही बसतो आहे. पाण्यावाचून विव्हळणाऱ्या चिमण्या, पाखरांनाही पाणी मिळावे यासाठी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीच्या विद्यार्थ्यांनी “एक घोट पाणी, पशू-पक्षांनसाठी उपक्रमांतर्गत झाडांवर छोटी छोटी पाण्याने भरलेली भांडी शालेय परिसरातील झाडांच्या फांद्यानवर लटकवून पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)