ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आणि वैभव विजयासह जिंकला..( विशेष)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आणि वैभव विजयासह जिंकला..( विशेष)

प्रकाशन: 28 Mar 2023 10:30 PM
वाचन संख्या 59

मालवण | सुयोग पंडित :आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.रक्तदान शिबीराचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांचे मित्र आणि कोल्हापूर येथील उद्योजक स्वरूप कदम यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.यामध्ये एकूण ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ठेवण्यात आला होता. कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करून हा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी कॉलजेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पुष्पहार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सतीश सावंत म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी यासाठी फार्मसी कॉलेज सुरु केले. या कॉलेजची झालेली प्रगती आम्ही पाहत आहोत आणि ऐकली आहे. कॉलेजची झालेली प्रगती हि आ. वैभव नाईक यांच्या कार्याची पोचपावती आहे. कोरोना काळात हे कॉलेज रुग्ण सेवेसाठी दिले होते. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले.समाजसेवेची परंपरा अशी कायम सुरु राहो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी उद्योजक संतोष गाडगीळ,उद्योजक सुहास गावडे,युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सचिव रमन बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. जगताप, प्रा. कुलकर्णी, प्रा. मेघा बाणे, आदिती सावंत आदींसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स