ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा शहरातील 'त्या' उपद्रवी माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी....!

बांदा शहरातील 'त्या' उपद्रवी माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी....!

प्रकाशन: 01 Oct 2021 10:46 PM
वाचन संख्या 118

ग्रामस्थांच्या मागणीला वनविभाग अधिकार्यांनी दिले सकारात्मक आश्वासन

बांदा | राकेश परब : गेल्या एक वर्षापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. परिणामी बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांच्याकडे ग्रामस्थांनी केली.
कट्टा कॉर्नर येथे दोन दिवसांपूर्वी सुजाता फोटो स्टुडिओचे केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसह अन्य ग्रामस्थांनी ‘त्या’ उपद्रवी माकडाबाबत हकिकत सांगितली. यावेळी वनरक्षक श्री. देसाई उपस्थित होते.
वनपाल मेस्त्री म्हणाले की, तो माकड जखमी असण्याची शक्यता आहे. शहरात केलेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्यासंदर्भात तसा जीआर नसून पंचनाम्याचा अहवाल प्रशासनास सादर करणार आहोत. काही ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकदा गाड्यांचे आरसे, सीट मोडणे, पिशव्या पळविणे किंवा घरात घुसून नासधूस करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्या उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे व नागरीकांचे नुकसान टाळावे अशी मागणी त्यांनी केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स