ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
त्रिंबक येथे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्रिंबक येथे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम....!

प्रकाशन: 26 Feb 2023 09:37 PM
वाचन संख्या 90

तृणधान्य पाक कला स्पर्धेत स्नेहलता मेस्त्री प्रथम

ब्यूरो चिफ/विवेक परब- त्रिंबक येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व ग्रामपंचायत त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमीत्त तृणधान्य पाककला स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. सरपंच किशोर त्रिंबककर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोपाळ गोसावी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. आचरा मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विद्दवेत्ता भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ शेटये सर यानी सद्य परिस्थितीवर भाष्य करत आंबा पीक मोहोर संरक्षण व किड नियंत्रण या बाबत मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व सांगितले. मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी यानी उपस्थितांना संतुलीत आहारा बाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यानी कृषी विभागाच्या विवीध योजना व pmfme योजने बाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. पाक कला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीम.रचना देसाई, श्री.डी एम.तोरणे यानी काम केले. त्रिंबक ग्रा.प.अंतर्गत ३५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्नेहलता मेस्त्री यानी प्रथम, सायली त्रिंबककर द्वितीय, सिद्धी गोसावी तृतीय क्रमांक पटकावला. तर मुग्धा बाणे, अस्मिता सुतार, प्राची त्रिंबककर, वर्षा जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या बक्षीस रकमेचे प्रायोजकत्व त्रिंबक उपसरपंच श्री.आशिष बागवे, तसेच उत्तेजनार्थ रकमेचे प्रायोजकत्व संतोष घाडीगवकर व ताकृअ कार्यालय मालवण यानी केले. किसान गप्पा गोष्टी व पाक कला स्पर्धा कार्यक्रम साठी गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशु बागवे, कृषी अधिकारी प.स मालवण श्री कांबळे, एस.जी परब, डी के.सावंत, सरमळकर, एस.डी कदम, एम.बी कदम, ए.डी कुरकुटे, श्रीम अमृता भोगले, श्रीम विद्या कुबल, श्रीम धामापूरकर, श्रीम स्नेहल जीकमडे, श्रीम चौखंडे, सौ. नेहा वेंगुर्लेकर, सौ. सपना तेली, श्रीम सावंत, ग्रा.प सदस्य त्रिंबक, त्रिंबक संस्था अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ सर, संतोष घाडीगावकर, अर्चित लेले व ठाणेश्वर महिला ग्राम संघ त्रिंबक मधील महिला वर्ग उपस्थीत होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स