बिळवस येथे भक्तीपूर्ण वातावरणात श्री गणेश विसर्जन...
एकवीस दिवसांच्या बाप्पांना दिला भावभक्तीपूर्ण निरोप…..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बिळवस सडा येथील २१ दिवसांच्या गणपती बाप्पांचे कोनीवाडी येथे जल्लोषात रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. यावेळी बिळवस पोलीस पाटील गोविंद सावंत,राहुल सावंत,आबा पालव,अशोक पालव,मोहन पालव,ज्ञानेश फणसे,प्रशांत फणसे,सुजित पालव,आदित्य सावंत,रोहित सावंत,अरुण पालव,पप्पु पालव, संदीप कांबळे आदी उपस्थित होते. एकवीस दिवसाच्या बाप्पांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करताना बिळवसवासायांनी कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि पुढील वर्षी बाप्पाने लवकर आगमन करावे अशी प्रार्थना केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)