ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशीत काजू व आंबा कलमे जळून खाक ; जिल्ह्यात काजू व आंबा बागायतींना आग लागायचे प्रमाण वाढत असल्याने बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त.

साळशीत काजू व आंबा कलमे जळून खाक ; जिल्ह्यात काजू व आंबा बागायतींना आग लागायचे प्रमाण वाढत असल्याने बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त.

प्रकाशन: 08 Feb 2023 02:55 PM
वाचन संख्या 391

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू, आंबा बागायतींना आग लागायची मालिका जवळपास गेले १५ दिवस सुरु आहे. त्यातील एक घटना ती देवगड तालुक्यातूनही समोर येत आहे. देवगड तालुक्यातील  साळशी येथील  हेदिचा आडवा(घाटोम) येथील काजू व आंबा  कलमांना आग लागून ती जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. साळशी येथील रहिवाशी दिलीप अनंत गावकर यांची हेदीचा आडवा (घाटोम) या  ठिकाणी काजू व आंबा कलमाची बाग आहे. या बागेला सोमवारी दुपारी १२ च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत दिलीप गांवकर यांची ८०० काजू कलमे व ४० आंबा कलमे होरपळून जळून खाक झाली. यामध्ये त्यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या काजू कलमांना  चांगला मोहर येऊन फलधारणा झाली होती. ऐन हंगामातच त्यांच्या हातचे पीक गेल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच चंद्रकांत गोपाळ  गांवकर यांची ७० काजू कलमे व  ४० आंबा कलमे आगीत जळून त्यांचे  दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेचा पंचनामा साळशी ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास गांवकर, तलाठी श्वेतांजली खरात, कृषी सहाय्यक फाळके, साळशी पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, विजय सुतार यांनी घटनास्थळी जाऊन केला. तसेच प्रकाश साळसकर यांच्या ३० काजू कलमांना  आग लागून  नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त बागायतदार शेतकरी यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स