कांदळगावात साडेपाच फुट लांबीच्या सर्पाला जीवदान..!
सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांची पर्यावरणपूरक कामगिरी…!
मसुरे | प्रतिनिधी : कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील प्रमोद परुळेकर यांनी बुधवारी सुमारे साडे पाचफुट लांबीच्या सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. येथील रमेश बेलवलकर यांच्या घरच्या अंगणात सर्प दिसून आल्यानंतर त्वरित सर्पमित्र परुळेकर याना बोलावण्यात आले. सदर सर्पास सुरक्षित रित्या पकडून परुळेकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. नागरी वस्तीत सर्प दिसून आल्यास त्याला न मारता सर्प मित्रास बोलावण्या चे आवाहन सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)