ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महावितरणच्या विज बिल वसुली मोहिमेविरोधात भाजप आक्रमक....!

महावितरणच्या विज बिल वसुली मोहिमेविरोधात भाजप आक्रमक....!

प्रकाशन: 29 Sep 2021 07:38 PM
वाचन संख्या 155

आचरा टेंबली येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना विचारला जाब

आचरा | विवेक परब : महावितरणने सुरू केलेल्या जाचक थकीत वीज बिल वसुली मोहिमेबरोबरच विविध समस्यांबाबत आज भाजप आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या आचरा टेबंली कार्यालयात धडक दिली यावेळी वीज कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना कल्पना न देताच वीज तोडणे तसेच अन्य प्रश्‍नांवर भाजप मालवण तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जि.प.सदस्य जेराँन फर्नांडिस यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी महावितरणचे अभियंता गणेश साखरे यांना धारेवर धरण्यात आले.

कोरोनानंतर आता व्यवसाय सुरू आहेत त्यामुळे ग्राहकांवर जबरदस्ती न करता ज्या क्षमतेने ग्राहक बिले आहेत ती भरून घ्या अन्यथा तालुक्यात वसुलीस जाणार्‍या कर्मचार्‍यांच्या बाबत अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी महावितरणची राहिल असा इशारा यावेळी देण्यात आला. चर्चेअंती जे ग्राहक वीजे बिले आपल्या क्षमतेनुसार भरत आहेत ती भरून घ्यावीत, त्यांची वीज तोडू नये तसेच जे ग्राहक काहीच वीज बिले भरत नाहीत त्यांचीच वीज जोडणी तोडण्याच्या सूचना महावितरणचे अधिकारी श्री संतोष यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसुली मोहिम अधिक तीव्: आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज भाजपच्यावतीने तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा टेंबली येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देण्यात आली.

यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जि.प सदस्य जेराँन फर्नांडिस, समिर बांवकर, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, संतोष गांवकर, प्रकाश मेंस्री, रवि घागरे, दत्ता वराडकर, मनोज हडकर, मंदार सरजोशी, देवेंद्र हडकर, रावजी सावंत, मेस्त, शेखर कांबळी, एकनाथ पवार इ कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील महावितरणची जी पदे रिक्त आहेत ती तत्काळ भरा अन्यथा वीज तोडणीचे आदेश देणार्‍या अधिकार्‍यांना तत्काळ येथे बोलावून घ्या अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका भाजप पदाधिकार्‍यांनी घेतली. महावितरणचे अधिकच ग्राहकांवर जबरदस्ती करत आहेत हे योग्य नाही. तोक्ते चक्रीवादळ काळात नागरिकांनीच महावितरणला सहकार्य केले आहे त्यामुळे याची जाणिव ठेवून नागरिकांना सहकार्य करा. अशी मागणी आचरा भाजपने केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स