ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भाजपा चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी संतोष तेली यांची निवड
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी संतोष तेली यांची निवड

प्रकाशन: 24 Sep 2021 12:04 PM
वाचन संख्या 54

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा गावचे सुपुत्र असलेले चित्रपट कलाकार संतोष तेली यांची भाजपच्या चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष गणेश काटे यांनी त्यांची निवड केली आहे.

फिल्म क्षेत्रात ते गेली १७ वर्षे कार्यरत आहेत. मुंबई येथे ओमी क्लासेसच्या माध्यमातून कला क्लासेस ते अनेक वर्षे चालवत आहेत. अत्यंत गरीब व खडतर प्रवासातून मार्गक्रमण करत त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले आहे. ‘नवे लक्ष’ सिरियल मध्ये सध्या ते काम करत आहेत. चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा सरचिटणीस पदावर त्यांनी काम केले आहे. संघटनेच्या माध्यमातून कोरोना काळात गरीब व गरजूंना मदतीचा हात त्यांनी दिला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत राज्य प्रदेशने त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. कामगार नेते संजय काणेकर, भाजपा कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे, चित्रपट कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विजय सरोज, प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे, भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेश सचिव रवींद्र महाडिक यांनी नुतन अध्यक्ष संतोष तेली यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना एकत्रित आणण्याचा आपला मानस आहे. कोरोना काळात दुर्लक्षित झालेल्या कलाकारांना संघटनेच्या माध्यमातून बळ देण्याचे काम केले जाईल. ग्रामीण भागातील कलाकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविल्या जातील. या मातीतल्या कलाकारांना मोठे करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे या बाबी प्राधान्याने केल्या जातील, असे संतोष तेली यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स