ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
"बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप..!"  ( सिनेपट, अमिताभ बच्चन वाढदिवस विशेष )
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

"बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप..!" ( सिनेपट, अमिताभ बच्चन वाढदिवस विशेष )

प्रकाशन: 11 Oct 2022 05:26 PM
वाचन संख्या 222

एकेकाळचा कुविख्यात गॅन्गस्टर विज्जू..!
गॅन्गगस्टरगिरी सोडून पॅरीसला स्थिरावलेला विजय ऊर्फ विज्जूला म्हणजे अमिताभ बच्चनजींना एका खास कामगिरीसाठी मुंबईत बोलावले जाते.
मुंबईत ए सी पी करण मल्होत्रा नामक एक अतीकर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी गुंडाचा व अंडरवर्ल्डचा खात्मा करायची शपथ घेऊन स्वच्छ मुंबई आपली मुंबईसारख्या मोहीमेचा धडाका लावून असतो. ए सि पी करण म्हणजे सोनू सूद हा गुंडांच्या नाठाळांच्या नाकी दम आणतोय हे अंडरवर्ल्डचा अनभिषिक्त राजा म्हणजे अलीभाई प्रकाश राज याला फार चिंतेचे असते. आधी पानी कम वाटलेला ए सी पी तर उकळत्या सकस दुधाप्रमाणे माणुसकीची रक्षा करतोय व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनतोय हे पाहून अलीभाईला काहीतरी कडक पाऊल उचलावे लागते तेच कडक पाऊल म्हणजे गॅन्गस्टरगिरी सोडलेला परंतु अजूनही ज्याच्या बंदुकीने कोणाच्याही मस्तकी गोळीचा टिळा लागू शकतो असा विज्जू आणि विजुची खासियत म्हणजे त्याच मस्तकाला लावलेल्या टिळ्यातून तो आणखी एक गोळी आरपार घालून त्याची नेमबाजीतील मास्टरी सर्वांना दाखवत आलेला असतो.

आता ए सी पी करण मल्होत्राचा खात्मा होतो का…?
विज्जूचे काय होते..? मुंबईत पोलिसांचे राज्य येते की पुन्हा गॅन्गस्टरांचा दरारा वाढतो हे पहाणे म्हणजे पुरी जगन्नाथ दिग्दर्शित साल http://localhost/news/public/uploads/2011 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप…!’

या सिनेमात वयाच्या सत्तरीत अमितजींना विविध छोटेमोठे स्टंटस, नृत्य आणि स्वॅग करताना पाहिले की त्यांचा हेवा वाटल्याशिवाय रहाणारच नाही असा सिनेमा. !
जबरदस्त संवाद व साधीच पण उत्कृष्ट प्रवाही पटकथा आणि चित्रण ही या सिनेमाची वैशिष्ट्ये.
विज्जुची एक छोटी मैत्रीण म्हणजे अमृता म्हणजे चार्मी कौर हिच्यासोबत तुफान व निखळ धमाल आणलेला विज्जू बघणे खरेच दोन पिढ्यांमधील अदृश्य भिंती लाथ मारुन पाडल्यासारखीच. .!
सोनू सूद ,सोनल चौहान ,हेमामालिनी, रविना टंडन यांचे मनभरून व आपापले अभिनय अगदी त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेला न्याय देतात.
मकरंद देशपांडेचा ‘मॅक’ आणि दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू याने साकारलेला ‘येडा’ छान स्मरणात रहातो.

अमितजींच्या वाढदिवशी व इतरही कधी त्यांचा एखादा सिनेमा बघावासा वाटला तर हा जरुर बघा.
नेटफ्लिक्सवर हा सिनेमा जरुर बघता येईलच.

आज अमितजींचे वय कितीही झाले तरीही वाढदिवसानिमित्त त्यांचे वय विचारणार्या प्रत्येकाला एकच उत्तर बुमरॅन्ग बनून उलटे येईल ,” बुढ़्ढ़ा होगा तेरा बाप…! और सैंकडो साल जिओ अमितजी आप..!

सुयोग पंडित

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स